Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) चा शोध सुरू आहे. मागील 3 महिन्यांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. कृष्णा आंधळेला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड भागातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे.पोलिस सध्या या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, कृष्णा आंधळे नाशिक मध्ये होता. त्याने कपाळावर टिळा आणि तोंडावर मास्क लावला होता. सकाळी9.30 च्या सुमारास तो दिसला होता. स्थानिकांनी त्याला हटकल्यानंतर तो दुचाकीवरून एका साथिदारासोबत पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे.पोलिसांकडून सध्या त्याचा शोध सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीने कृष्णा आंधळे मखमलाबादच्या दिशेने गेल्याचं म्हटलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळेच आहे का? याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही.

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? 

संतोष देशमुख हत्या प्रकरण

डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. सध्या या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपासूनच कृष्णा अंधाळे फरार आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची ज्या क्रुरपणे हत्या करण्यात आली त्याचे फोटोज, व्हिडिओज समोर आले आहे. आरोपींनी संतोष देशमुखांना दिलेल्या यातना पाहून सारा महाराष्ट्र हळहळला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी सार्‍याच स्तरामधून मागणी समोर येत आहे. नक्की वाचा: Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी; CID च्या आरोपपत्रात खुलासा .

दरम्यान कृष्णा आंधळे वर यापूर्वी देखील एक खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. सीआयडी तपासानुसार,  कृष्णा आंधळे वर  2023 मध्ये कलम 307 (खुनाचा प्रयत्न) चा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही तो फरार आहे. धारूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.