Close
Advertisement
 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

NCP Party Crisis: शरद पवार विरुद्ध अजित पवार, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घमासान; दोन वेगवेगळ्या बैठकांसाठी आमदार रवाना

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे | Jul 05, 2023 12:54 PM IST
A+
A-
05 Jul, 12:54 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या गटाचे नेते पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचताच शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.

ट्विट

05 Jul, 12:51 (IST)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि प्रदेश प्रतिनिधी यांची एमईटी वांद्रे येथे बैठक बोलावली आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी वायबी चव्हाण सभागृहात सर्व सदस्यांची बैठक बोलावली आहे. या वेगवेळ्या बैठकांतील क्षणचित्रे खालील प्रमाणे.

ट्विट

05 Jul, 12:47 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार समर्थक गटातील महत्त्वाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड मुंबई येथील वायबी सेंटरला पोहोचले आहेत. दुपारी एक वाजता शरद पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला आणखी नेते येतील असे आव्हाड म्हणाले.

ट्विट

05 Jul, 12:17 (IST)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एमईटी वांद्रे येथे दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते समर्थक राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन करतील. या वेळी त्यांनी झेंडाही फडकावला.

ट्विट

05 Jul, 11:58 (IST)

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वायबी सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावण्यास आमदारांनी सुरुवात केली आहे. वायबी सेंटर येथे दाखल झालेल्या आमदारांची पहिली यादी सोशल मीडियातून पुढे आली आहे. ते आमदार खालीप्रमाणे.

वाय बी चव्हाण इथे पोहचलेले आमदार
किरण लहामाटे
अशोक पवार
रोहीत पवार
देवेंद्र भुयार
राजेंद्र शिंगणे
अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कधी नव्हे तो इतक्या सत्वपरीक्षेला सामोरे जातो आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच इतके मोठे घमासान आणि कुटुंबकलह पाहायला मिळतो आहे. पाठीमागील अनेक दशकं राज्याचे राजकारण एकहाती फिरवणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर त्यांच्याच कुटुंबातून आव्हान उभे राहिले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार (Sharad Pawar vs. Ajit Pawar) असा सामना पाहायला मिळत आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या गटाची वेगवेगळी बैठक बोलावली आहे. शरद पवार यांची बैठक वायबी चव्हाण सेंटर येथे पार पडत आहेत. अजित पवार गटाची बैठक वांद्रे येथे एमईटी इन्स्टीट्यूट पार पडत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचा दावा काहींकडून करण्यात आला आहे. तर शरद पवार यांना 13 आमदारांनी पाठींबा दिल्याचे वृत्त आहे. हे आकडे केवळ दावा आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष दोन्ही गटांच्या बैठका पार पडत नाहीत तोवर कोणाकडे किती आमदार याबाबत कोणतीच स्पष्टता येणे कठीण होऊन बसले आहे. शरद पवार गटाची बैठक वायबी सेंटर येथे दुपारी 1.00 वाजता पार पडत आहे. तर अजित पवार गटाची बैठक दुपारी 11 वाजता एमईटी येथे पार पडत आहे. (हेही वाचा, Pawar vs Pawar: NCP कुणाची? संख्याबळाचे चित्र आज स्पष्ट होणार; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मुंबईत बैठका)

दरम्यान, शरद पवार की अजित पवार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. हा संभ्रम केवळ आमदारांमध्येच नाही. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही हा संभ्रम पाहायला मिळत आहे. आगोदर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये 'विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती' असे म्हणण्याची वेळ आली आहे. तरीही अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आणि शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या ठिकाणी म्हणजे वायबी सेंटर येथे गर्दी जमली आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतोदांनी व्हीप काढले आहेत.


IPL 2025 Auction
Live

Manav Suthar

Sold To

GT

Hammer Price: ₹30 Lakhs


Show Full Article Share Now