अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण? बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण
Amol Mitkari, Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवदी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघात मिळालेले लीड, देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले लीड आणि बारामतीमध्ये भाजपचे जप्त झालेले डिपॉझिट याची आठवण करुन दिली. तसेच, अजित पवार यांना मिळलेले लीडही सांगितले आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस हे असले 50 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. ते दबंग नेते असल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या या विधानावर मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. ते दबंग नेते आहेत. असले 50 अजीत पवार ते खिशात घेऊन फिरतात. त्यामुळे तुम्ही त्यांना कमी लेखू नका. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. (हेही वाचा, Chandrakant Patil On Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता; 'मुका' विधानावर चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण)

'कुण्या गावाची गं, कुण्या राजाची तू गं राणी' मिटकरी यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

अमोल मिठकरी यांनी एका गाण्यातून चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'अहो, चंद्रकांत पाटील अख्या भारताला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहीत आहे की अजितदादा काय आहेत? तुम्ही काय 100 अजित पवार खिश्यात बाळगल्याची भाषा तुम्ही काय करताय, तुमच्या सहित 105 आमदार अजितदादांनी तेव्हाच गुंडाळले ज्यादिवशी राष्ट्रपती राजवट उठवली.'

अमोल मिटकरी ट्विट

पुढे बोलताना मिटकरी यांनी म्हटले की, 'तुम्ही सुद्धा स्वतंत्र्य मतदारसंघ शोधत एका प्रामाणिक महिलेला बळी घेतला. कोल्हापूर चप्पल दाखवल्यामुळे तिथून पळावं लागलं, आता पुणेरी मिसळ खायची असेल तर तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस यांनी नांदाला लागावं. तुम्हाला बघून मला पिंजरा चित्रपटातील गाणं आठवतं 'कुण्या गावाची गं, कुण्या राजाची तू गं राणी' अजितदादांचा नाद करू नका'.

व्हिडिओ

दरम्यान, मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना टोला लगावताना म्हटले की, 'चंद्रकांत पाटील, दबंग कोण या प्रश्नाचे उत्तर कोथरूडमध्ये तुम्हाला मिळालेली लीड 25, 495 दबंग नेते देवेंद्रजी यांना मिळालेली लिड 49,482 = 74 हजार 977 बारामतीत तुमच्या पक्षाचे डिपॉझिट जप्त करून अजितदादांची लीड 1,65, 265. आता दबंग कोण सांगा पाहू.'