Sharad Pawar | (Photo Credit - Facebook)

कसबा विधानसभाप पोटनिवडणूक (Kasba by-election) निकालाची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही कसबा येथील महाविकासआघाडीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकासआघाडीतील घटक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जर एकदिलाने प्रयत्न केले तर, काय परिणाम होऊ शकते हे कसब्यातील विजयाने दाखवून दिले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. तसेच, आगामी काळात मविआमधील घटक एकत्र येतील असे संकेतही दिले.

लोकांना बदल हवा आहे हे कसब्यातील निवडणुकीतून सिद्ध झाले. कसब्यामध्ये धनशक्ती सक्रीय झाल्याच्या बातम्यायेत होत्या. मात्र, जनतेने एकदा का ठरवले आणि उमेदवार सक्षम असेल तर लोक जनशक्ती धनशक्तीला जुमानत नाही. काही झाले तरी, लोक त्यांच्या मनात जे आहे त्यानुसारच निर्णय घेतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे शरद पवार म्हणाले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (हेही वाचा, Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे सूडाचे राजकारण भाजपला रसातळाला नेणार, रवींद्र धंगेकरांचे वक्तव्य)

वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, महाविकासआघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबाबत बोलण्याचा मला अधिकार आहे. जे लोक मविआचे सदस्यच नाहीत त्यांच्याबद्दल मी कसे बोलणार. तो माझा नव्हे तर त्यांचा अधिकार आहे, असे म्हणत पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

त्यांनी मान्य तर केलं!

कसब्यातील विजय हा उमेदवाराचा म्हणजेच व्यक्तीचा विजय असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, त्यांची विधाने पाहता आमच्याकडचे उमेदवार सक्षम आहेत हे तरी त्यांनी मान्य केले, असे मिष्कीलपणे म्हटले. यालाच लागून उद्धव ठाकरे यांच्या खेड येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, असा आरोप झाला. यावर बोलतान शरद पवार म्हणाले, याचा अर्थ असा की, जर तसे असेल तर लोकांच्या मनात काय आहे. त्यांना सत्तापरीवर्तन कसे हवे आहे हे उद्धव ठाकरे यांच्या सभेतून दिसते.