NCB Maharashtra: मुंबई येथून 4 किलो चरस जप्त, दोघांना अटक; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Charas in Mumbai | (Photo credit- ANI)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) अर्थातच एनसीबीने (NCB) मुंबई येथून चार कोलो वजनाचे अत्यंत उच्च दर्जाचे चरस (High-Quality Charas) जप्त केले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यातआली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या चरसची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीला संशय आहे की, हे चरस नववर्षानिमित्त (New Year Parties) आयोजित पार्ट्यांमध्ये वापरण्याची आरोपींची योजना होती. या चरसला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून अधिक मागणी असू शकते. अटक केलेल्यांपैकी एकाचे नाव एम कुमार तर दुसऱ्याची अजय असल्याचे समजते.

एनसीबी अधिकाऱ्यांनी 27 डिसेंबर रोजी दोघांना अटक केली. जे ठाणे येथे ट्रेनची वाट पाहात थांबले होते. पोलिसांनी पकडलेल्या कथीत तस्कराची ओळख एम कुमार अशी झाली आहे. एम कुमार हा अंमली पदार्थांचा तस्कर आणि पुरवठादार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीत असेही पुढे आले की, तो मुंबईत एसी कुमार याच्याकडून आणखी काही माल खरेदी करण्यासाठी निघाला होता. प्राप्त माहितीनुसार, एम कुमार आणि अजय यांन पकडण्यासाठी एनसीबीने सापळा लावला होता. तो 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबरच्या मध्यरात्री ट्रेनने येताच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर्णनावरुन त्याला ओळखले आणि ताब्यात घेतले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एका एम कुमार आणि अजय यांच्याकडून एक तपकीरी रंगाची पिशवी जप्त केली. ज्यात टेपमध्ये गुंडाळलेली चरसची सुमारे 16 पाकिटे आढळून आली. (हेही वाचा, Goa Drug Case: बाप-लेकीने चालवलेले ड्रग्ज रॅकेट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून उद्ध्वस्त, दोघांना अटक)

ट्विट

एनसीबीला माहिती मिळाली होती, की काही लोक हिमाचल प्रदेश आणि उत्तरांखड येथून अंमली पदार्थांची तस्करी आणि साखळीत गुंतले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी आपले जाळे उभारले आहे. ज्याचा वापर देशातील विविध शहरांमध्ये अंमली पदार्थांचा म्हणजेच ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी केला जातो आहे. त्यातच एका स्थानिक वितरकाकडे डिलिव्हरी करण्यासाठी एक वाहक ड्रग्जची खेप घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी सर्व घडामोडींवर बारकाईने नजर ठेऊन होते.