Kidnapping | (File Image)

घणसोली (Ghansoli) येथून बारावीच्या परीक्षेसाठी (Maharashtra Board HSC Exam) निघालेला मुलगा गायब झाल्याची पोलिसात तक्रार आल्यानंतर त्याची शोधाशोध झाली. दरम्यान कर्जत मध्ये 2 दिवस राहिल्यानंतर आता तो शुक्रवारी परतला आहे. बुधवार 21 फेब्रुवारी दिवशी वाशीच्या St. Mary College परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तो निघाला होता. सकाळी 8.45 च्या सुमारास त्याने घर सोडलं. मात्र त्या दिवशी तो घरी न आल्याने पालक काळजीत पडले. दरम्यान काही वेळाने मुलाने पालकांशी संपर्क साधून आपण सुरक्षित असून लवकरच घरी परतणार आहोत असेही त्याने स्पष्ट केले.

Prithviraj Ghorpade, Anti Human Trafficking Unit of Navi Mumbai यांनी FPJ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, 'मुलाने आपण फॉर्म नंबर 17 भरला नसल्याचं कबूल केले. खाजगी विद्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना हा 17 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. हा मुलगा सुरुवातीला फॉर्म क्र.17 गोळा करण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता पण फॉर्मचे वाटप सुरू न झाल्याने त्याला तो मिळाला नाही आणि जेव्हा तो फॉर्मसाठी आला तेव्हा त्याला कळवण्यात आले की फॉर्म देण्याचा शेवटचा दिवस संपला आहे.'

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलाला दहावी मध्ये 75% मार्क्स होते. या मुलाचे बाबा माथाडी कामगार आहे तर आई गृहिणी आहे. 3 मुलांमध्ये हा दुसरा मुलगा आहे. मुलगा घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने तातडीने किडनॅपिंगची केस नोंदवली होती. हा तपास नंतर AHTU कडे देण्यात आला. Student Goes Missing on Exam Day: नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू .

सध्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण असह्य झाल्याने काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत.