Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिककरांना एक गुड न्यूज दिली आहे. होय, आपल्या हक्काच्या घरासाठी नाशिककरांना आता वाट पाहवी लागणार नाही. नाशिकमध्ये म्हाडाला 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे मिळाली होती. त्यामुळे यात काहीतरी काळेबेरे घडले असावे असा आम्हाला संशय आला. त्यानंतर आम्ही चौकशी सुरु केली आणि आतापर्यंत म्हाडा चक्क 2031 घरे प्राप्त झाली आहेत. या घरांची सोडत आणि लॉटरी येत्या मे आणि जून महिन्यात काढण्यात येईल.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीमध्ये, 'नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे', असे म्हटले आहे. नाशिक हे माझे गाव असल्याने मी स्वत: तिथे जाऊन म्हाडाची लॉटरी काढेन असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

ट्विट

म्हाडा काय आहे?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ( Maharashtra Housing and Area Development Authority) असे मुळ नाव असून 'म्हाडा' हे प्रचलित नाव आहे. ही एक राज्य सरकारची संस्था आहे. या प्राधिकरणाची स्थापना 5 डिसेंबर 1977 रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलीनकरण करुन म्हाडा अस्तित्वात आली.