Balasaheb Sanap Join BJP: बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', दोन वर्षांमध्ये बदलले तीन पक्ष
Balasaheb Sanap Join BJP | (Photo Credits: Facebook)

नाशिक (Nashik जिल्ह्यात शिवसेना (Shiv Sena) पक्षाला काहीसा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी धनुष्य बाणाला 'जय महाराष्ट्र' (Jai Maharashtra) करत भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांचा भाजप (BJP) प्रवेश मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात पार पडला. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतरहीकाही नेते उपस्थित होते.

दरम्यान, सानप यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचे समजते. नाशिक भाजपमधील अनेक नेते या पक्षप्रवेशाबाबत खासगीत नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब सानप यांचा विक्रम असा की त्यांनी दोन वर्षांमध्ये तीन पक्ष बदलले. चौथ्या वेळी आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे सानप यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून भाजप नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Chhagan Bhujbal speech Nashik: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची टोलेबाजी)

बाळासाहेब सान हे नाशिक महापालिकेचे पहिले महापौर राहिले आहेत. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये त्यांनी भाजप तिकीटावर निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. मात्र, पुढे त्यांनी पक्ष बदलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा निवडणकू 2019 लढवली. परंतू, त्यात ते पराभूत झाले. पुढे लगेचच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेतही ते रमले नाहीत. त्यांनी लागलीच 'जय महाराष्ट्र' करत भाजप प्रवेश केला. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सानप यांच्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सध्यातरी सुरु आहे.