Chhagan Bhujbal speech Nashik: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची टोलेबाजी
Chhagan Bhujbal, Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Nashik District ) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या उपस्थिती जोरदार टोलेबाजी केली. भुजबळ यांनी आपल्या भाषणात राज्यपालांनाही चिमटे काढले. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमातीचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

छगन भुजबळ यांनी या वेळी केलेल्या भाषणात म्हटले की, राज्यपाल महोदयांनी आपण नाशिक येथेही एक राजभवन बांधावे. त्यामुळे आपले येथे वारंवार येणे होईल. त्यानिमित्ताने इथली विकासकामे वारंवार मार्गी लागतील. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात गेल्या काही काळापासून असलेले सख्य पाहता महाविकासाआघाडीचे मंत्री राज्यपालांच्या उपस्थितीत काय बोलणार याबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. भुजबळ यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार टोलेबाजी केली.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक येथील वातावरण आरोग्यदायी आहे. शिवाय नाशिक ही सांस्कृतीक नगरी आहे. येथील वातावरण धार्मिक आहे. त्यामुळे आपण जर येथेच राजभवन बांधाल तर आमच्यासोबत आपली वारंवार भेट होत राहील. (हेही वाचा, Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari: 'शरद पवार यांना भेटा' राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना सूचवले)

गेल्या काही काळापासून महाविकासआघाडी सरकार वर राज्यपाल यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भल्या सकाळी शपथ देऊन नवे सरकार जन्माला घातल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबतचा प्रस्ताव असो, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो अथवा राज्यातील काही समूह, नेते आणि व्यक्तिमत्वांनी राज्यपालांना जाऊन भेटणे असो, राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.