Schools Teachers | (Photo Credit- X)

Teachers Shortage in Ambupada, Nashik: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा-बेडसे गावातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा (Maharashtra Schools) शिक्षक टंचाईचा तीव्र सामना करत आहे. इतका की, शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थी केवळ दोन शिक्षकांच्या देखरेखीखाली (Staff Shortage in Schools) आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यी योग्य शिक्षणापासून वंचित तर आहेतच, पण शिक्षकांवरी मोठ्या प्रमाणावर ताण आहे. कोणत्या वर्गावर जावे आणि कोणत्या वर्गास कसे व्यवस्थापीत करावे हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. शाळेचे प्राचार्य के. बी. बचाव यांनी सांगितले की, पाठिमागील सहा महिन्यांपासून ही भीषण परिस्थिती आहे. ज्यामुळे त्यांना शाळेचे व्यवस्थापन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जास्त मागू नका, निम्म्यावरच भागवा

नाशिक येथील शाळेला किमान चार शिक्षकांची आवश्यकता आहे. असे असले तरी, निम्म्यावरच भागवा अशी म्हणन्याची वेळ आली आहे. शाळेत केवळ शिक्षकांची संख्याच निम्मी नाही तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्याही तशीच आहे. परिक्षेचा काळ असल्याने तेवढ्यापुरते गणिताचे शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पण ते शक्षक देखील प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. त्यामुळे इतर विषयांच्या शिक्षकांचे करायचे काय? असा सवाल आहे. शाळेत इंग्रजी विषय शिकविण्यासही शिक्षक नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा)

'दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांचे प्रमाण पुरेसे आवश्यक'

महाराष्ट्रतील अनेक शाळा शिक्षक टांचाईचा सामना करत आहेत. शाळेचे प्राचार्य के. बी. बचाव यांनी सांगितले की, शाळेमध्ये असलेल्या शिक्षक टंचाईबाबत प्रशासनाच्या कानावर अनेक वेळा घातले आहे. अतिरिक्त शिक्षकांची पूर्तता करावी यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अनेक पत्रेही दिली आहेत. पण असे असूनही त्यांना शिक्षक मिळत नाहीत. "विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार दर्जेदार शिक्षण मिळेल याची खातरजमा करण्यासाठी आम्हाला तातडीने अधिक शिक्षकांची गरज आहे", असे प्राचार्य सांगतात. त्याच वेळी ते, रिक्त पदे भरण्यासाठी त्वरित कारवाई करण्याच्या गरजेवरही भर देतात. (हेही वाचा: CBSE Board Exam Date Sheet 2025: सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा; पहा वेळापत्रक)

प्राचार्यांकडून शिक्षक पूर्ततेची मागणी

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती धोक्यात

प्राचार्य सांगतात, शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 100 हून अधिक आहे. विद्यार्थी संख्या विचारात घेता किमान 4 शिक्षकांची आवश्यकता आहे. पण, असे असले तरी, आम्हाला केवळ दोन शिक्षकांवर काम भागवावे लागत आहेत. ज्यामुळे गणित, इंग्रजी यांसारखे मुख्य विषय दुर्लक्षीत राहतात. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणखी धोक्यात येते. शिक्षकांची अनुप्लब्धता हा संस्थेसाठी पाठिमागील प्रदीर्घ काळापासून चिंतेचा विषय राहिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.

प्राचार्यांवर प्रचंड ताण

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा-बेडसे गावात निर्माण झालेली किंवा पाहायला मिळणारी स्थिती हे प्राथनिधीक चित्र आहे. ग्रामिण भागातील अनेक शाळांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शाळेतील अपुरा कर्मचारीवर्ग तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. सामाजिक स्तरावरुनही या विषयाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.