Nashik Accident: नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. टेम्पो कारवर कोसळली आहे. या अपघातात चार प्रवाशांनी जीव गमावला आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर ही घटना घडली. भरधाव आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चार प्रवासांचा मृत्यू (Death) झाला आहे. सुदैवाने या अपघातात एक महिला बचावली आहे. अपघाताची माहिती कळताच, घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अपघात घडला. रात्री ८च्या सुमारास ही घटना घडली.धडक इतक्या जोरात होती की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर चंदनापुरी गावकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतला आणि अपघातात अडकलेल्यांना तात्काळ मदत सुरु केली. दरम्यान घटनेत एका महिलेचा जीव वाचला आणि चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृतांपैकी दोन वर्षीय चिमुकली देखील होती. (हेही वाचा-नागपूर- अमरावती मार्गावर अपघात पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थांबवला ताफा,
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. ओजस्वी धारणकर (2 वर्ष), आशा धारणकर, सुनील धारणकर (65) आणि अभय विसाळ (48) या चौघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. अपघातानंतर वाहतुकसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सेवा सुरळीत केली.