Narayan Rane On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला, नारायण राणे यांच्याकडून भाजवर निशाणा साधल्याचे जुने ट्विट पुन्हा चर्चेत
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

Narayan Rane On Devendra Fadnavis: भाजप पक्ष सोडून आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्याबद्दल आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम ठोकला असून त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली. त्यात खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्याचे दिसून आले. त्यानंतर आता भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी 2016 रोजी केलेले एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी भाजपवर निशाणा साधण्यासह एकनाथ खडसे यांच्याबद्दल ही एक मोठे विधान केले आहे.(Devendra Fadnavis On Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी मला 'व्हिलन' ठरवले असून यावर योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन- देवेंद्र फडणवीस)

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला आहे. तर भाजप मध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा ही प्रयत्न सुरु आहे. तर ट्विटची तारीख पाहता ती 2016 मधील आहे. मात्र आज खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे.(Eknath Khadse on Devendra Fadnavis: महिलेच्या छळाचे खोटे आरोप लावत FIR दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्याचा एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गौप्यस्फोट)

तर एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यात खडसे यांनी असे म्हटले की, माझे जीवन उद्धवस्त करण्याचा फडणवीस यांच्याकडून प्रयत्न केला गेला. तसेच एका महिलेची छेड काढल्याच्या खोट्या आरोपाखाली पोलिसांना माझ्या विरोधात एफआयआर दाखल करायला लावला. मात्र नंतर तो गुन्हा मागे घेण्यात आला. तसेच भ्रष्टाचाराबद्दल ही चौकशी केली गेली. मात्र नंतर ते प्रकरण शांत झाले. त्यामुळे भाजपात राहून एकूणच मनस्ताप सहन केला आहे.