Devendra Fadnavis On Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी मला 'व्हिलन' ठरवले असून यावर योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस आणि आमदार एकनाथ खडसे (संग्रहित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

Devendra Fadnavis On Eknath Khadse: भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण एकनाथ खडसे हे राजीनामा देणार हे कालपर्यंत स्पष्ट झाले होते. मात्र त्यावर अधिकृतरित्या कोणताही घोषणा करण्यात आलेली नव्हती. परंतु आज एकनाथ खडसे यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी पक्ष सोडल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली आहे. फडणवीस यांच्यामुळे मला फार मनस्ताप झाल्याचे ही एकनाथ खडसे यांनी म्हटले. याच कारणांमुळे मला पक्षातील व्हिलिन ठरवल्याने योग्य वेळ आली की खडसे यांना उत्तर देईन असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी असे ही म्हटले की, एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला हे अत्यंत दुर्दैव आहे. पण पक्ष सोडल्यानंतर त्यांनी मला व्हिलन म्हणून म्हटले आहे. त्यामुळे याचे उत्तर त्यांना आता वेळ आल्यावर दिले जाईल. तसेच एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवरुन ते म्हणाले की, ऐवढ्या अडचणी होत्या तर खडसे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती. देवेंद्र फडणीस हे अतिवृष्टी भागात सध्या दौऱ्यावर गेले असून त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबद्दल त्यांनी जास्त काही भाष्य केले नाही.(Eknath Khadse on Devendra Fadnavis: महिलेच्या छळाचे खोटे आरोप लावत FIR दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्याचा एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गौप्यस्फोट)

तसेच भाजप पक्ष हा यापूर्वीपासून मजबूत आहे. त्यामुळे कोण्याच्या येण्याने किंवा जाण्याने पक्ष थांबत नसल्याचे  ही देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपात अर्धसत्य आहे. त्यामुळे आता योग्य वेळी उत्तर दिले जाईल असे फडवणीस यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे यांच्यानंतर पक्षात नाराज असलेले नेते सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र यावर ही फडणवीस यांनी उत्तर देत म्हटले आहे की, कोणीही पक्षातून जाणार नाही आहे.