Eknath Khadse on Devendra Fadnavis: भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राजकरणात सध्या याच विषयाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. तर येत्या 23 ऑक्टोंबरला एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत. या कारणामुळे भाजपला मोठा धक्का बसू शकतो असे ही बोलले जात आहे. तर पक्षाचा राजीनामा एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. तर पक्ष सोडण्यामागे माझे वैयक्तिक कारण असल्याचे ही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सुद्धा एक मोठा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप लावत एका महिलेचा छळ केल्याचे म्हणत पोलिसांना FIR दाखल करण्यास सांगितल्याचे खडसे यांनी म्हटले. तसेच हा गुन्हा नंतर मागे घेण्यात आल्याचा खुलासा सुद्धा खडसे यांनी केला. माझ्या विरोधात भ्रष्टाचारासंबंधित सुद्धा चौकशी केली गेली. मात्र ते नंतर निवळले. मी भाजपात खुप त्रास सहन केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.(Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण, पाहा ट्विटमध्ये काय म्हणाले?)
I will be joining the NCP (Nationalist Congress Party) on October 23: Eknath Khadse after resigning from the BJP pic.twitter.com/F5YfOQ5cG0
— ANI (@ANI) October 21, 2020
दरम्यान, खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपने त्यावर प्रतिक्रिया दिली. भाजपने असे म्हटले की, कोणताही नेता, कार्यकर्ता पक्ष सोडून जातो तेव्हा पक्षासाठी तो दु:खाचा क्षण असतो. परंतू, असे असले तरी एकनथ खडसे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ही प्रतिक्रिया भाजपचे प्रमुख प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.