Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण, पाहा ट्विटमध्ये काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वगळता भारतीय जनता पक्ष अथवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्यांवरआपल class="menu_nav_alink dropdown_toggle" href="https://marathi.latestly.com/social-viral/" title="व्हायरल">व्हायरल
Close
Search

Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण, पाहा ट्विटमध्ये काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वगळता भारतीय जनता पक्ष अथवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्यांवरआपली नाराजी नाही. आपण केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भारती जनता पक्ष (BJP) सोडत आहोत असे एकनाथ खडसे यांनी सांगितले तसेच, चंद्रकांत पाटील वगळता पक्षातून मनधरणीसाठी आपल्याला कोणाचाही फोन आला नाही, असेही खडसे यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण, पाहा ट्विटमध्ये काय म्हणाले?
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी खडसे यांनी भाजप का सोडत (Eknath Khadse Quits BJP) आहोत याचे कारणही सांगितले. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घोषणा केल्यानंतर खडसे जळगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वगळता भारतीय जनता पक्ष अथवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्यांवरआपली नाराजी नाही. आपण केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भारती जनता पक्ष (BJP) सोडत आहोत असे एकनाथ खडसे यांनी सांगितले तसेच, चंद्रकांत पाटील वगळता पक्षातून मनधरणीसाठी आपल्याला कोणाचाही फोन आला नाही, असेही खडसे यांनी या वेळी सांगितले.

जळगाव येथी पत्रकार परिषदेत खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. खडसे म्हणाले, 'मी मंत्री असताना माझ्यावर कारणाशिवाय आरोप झाले. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असेही पुढे सिद्ध झाले. परंतू, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेस यांच्यासह इतर कोणीही माझ्या राजीनाम्याची अथवा चौकशीची मागमी केली नाही. तरीसुद्धा माझा राजीनामा घेण्यात आला. हे फार खेदजनक होते.' (हेही वाचा, Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांना भाजपकडून शुभेच्छा)

पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की 'गेली 40 वर्षे आम्ही पक्षासाठी कष्ट केले. पक्षासठी आयुष्य घालवलं. राज्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना लोक आम्हाला दगड धोंडे मारत होते. आमच्या अंगावर थुंकत होते. अशा काळात आम्ही भाजप राज्यभर वाढविण्यासाठी प्रयत्न केले. पक्ष वाढवला. या प्रदीर्घ काळात मझ्यावर कोणीही तक्रार केली नाही. मी कोणावरही नाराज नाही. जी काही तक्रार होती ती मी वारंवार बोलून दाखवली', असे खडसे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत खडसे म्हणाले की, एक प्रकारे आमच्यावर पाळत ठेवली जात होती. त्यांनी ज्या प्रकारे माझ्यावर विनयभंगाचा खटला दाखल केला. भूखंड प्रकरणात चौकशी लावली. त्याचा प्रचंड मनस्ताप झाला. विनयबंघाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजातने सांगितलं. यावर मी म्हटलं की, हे काम कायदेशीरपणेही करता आलं असतं. पण त्यांनी हे केले नाही. मला नाहक बदनामी सहन करावी लागली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्यात आले, असेही खडसे म्हणाले.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस