एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. कोणताही नेता, कार्यकर्ता पक्ष सोडून जातो तेव्हा पक्षासाठी तो दु:खाचा क्षण असतो. परंतू, असे असले तरी एकनथ खडसे यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाजप प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी सांगिले की, एकनाथ खडसे हे भाजपचे खूप जुणे आणि ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे ते पक्ष सोडतील असे मुळीच वाटत नव्हते. त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी पक्षाने शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांनी केलेल ट्विटही डिलिट केले. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती की एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत. परंतू, अखेर त्यांनी तो निर्णय घेतला. (हेही वाचा, Eknath Khadse To Join NCP: एकनाथ खडसे 23 ऑक्टोबरला एनसीपी मध्ये प्रवेश करणार; जयंत पाटील यांची माहिती)
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की, खडसे हे पक्ष सोडतील असे वाटले नव्हेत. त्यांनी पक्षाला खूप काही दिले. पक्षानेही त्यांना बरेच काही दिले, असे म्हटले आहे.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, प्रखर राष्ट्रवादी पक्षाकडून बुरखा घातलेल्या राष्ट्रवादी पक्षात खडसे यांनी प्रवेश केला. जाने वाले हो सखे तो वापस आना.. असे म्हणत शायराना अंदाजात सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंना साद घातली आहे.
दरम्यान, भाजप नेते राम शिंदे यांनी मात्र तीव्र प्रतिक्रया देत म्हटले आहे की, एकनथ खडसे यांनी यांना भाजपमध्ये जी किंमत होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळणार नाही. त्यांच्यासोबत जनमत असलेला एकही नेता जाणार नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.