Delhi Crime: लग्नाच्या काही तासांपूर्वीची मुलाची हत्या, आरोपी वडिलांना अटक,दिल्लीतील घटना
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Crime: दक्षिण दिल्लीत आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आले. धक्कादायक म्हणजे लग्नाच्या मिरवणूक वधूच्या घरी निघण्याच्या काही तासांच्या आधी हत्या केली. मुलाने मनाविरुध्द लग्न करायचे ठरवले होते. त्याचाच राग मनात धरत आरोपी पित्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर अनेक वार केले. हल्लेत मुलगा गंभीर जखमी झाला होता.त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं परंतु उपाचारा काही मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा- परप्रांतीय महिलेचा नाशिकमध्ये खून

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सिंघल असं मृत तरुणाचे नाव आहे. गौरव एका महिलेच्या प्रेमात होता.तिच्यासोबत लग्न करायचं ठरवलं परंतु त्या दोघांचे संबंध घरांच्या पसंती आले नाही. घरांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याच्या रागातून हत्या केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी गौरवचा खून ज्या खोलीत झाला होता त्याखोलीत पोलिसांनी शोध सुरु केला. गुन्हा लपवण्यासाठी गौरवला रक्त बंबाळ परिस्थिती ओढून नेण्यात आल्याच्या काही खूना दिसून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी वडिलांना चौकशीत घेतले.

चौकशीतून आरोपी पित्याने खुनाची कबुली दिली. चौकशीतून असे ही समोर आले की, गौरव मनाविरुध्द लग्न करत असल्याने त्यांच्या अनेकदा वाद होत असायचे. सुरुवातीली आरोपींने उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांनी कसुन चौकशी घेतली आणि आरोपीचा शोध लावला.पोलिसांनी आरोपी पित्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींने पोलिसांना सांगितले की, मला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही हे मला आधीच करायला हवे. या भाष्यामुळे पोलिसही चक्रावले.