खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाने आपल्याच चुलत्याची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील घाट नांदूर (Ghatnandur) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या चुलत्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. परंतु, चुलत्याने नकार देताच आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे.
जनार्धन मुंजाजी धोंगडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अर्जुन दत्तात्रय धोंगडे असे हल्ला करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी अर्जुनने आपल्या चुलत्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. मात्र, चुलत्याने नकार दिला. यावर संतापलेल्या अर्जुनने चुलत्याच्या हातावर कत्तीने सपासप वार केले. यात जनार्धन गंभीर जखमी झाले. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी वैशाली धोंगडे हिने प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान जनार्धन यांचा मृत्यू झाल्याची माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Nagpur Gangrape: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; पाच जणांना अटक
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतण्या अर्जुन धोंगडे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.