Muralidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप: तक्रार दाखल; जाणून घ्या कारण

काँग्रेसने पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यंदा भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. अशात, काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिराती केल्या आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली आहेत. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण)

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितलं. 'राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा काँग्रेसने केला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून 'राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात' या मथळ्याखाली जाहिरात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

दरम्यान या निवडणुकीत मोहोळ यांच्यासमोर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान आहे. धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत गमावत असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने धंगेकरांना उमेदावारी दिली आहे.