Mumbai Admission Scam: मुंबईमध्ये दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर आता उच्च शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशप्रक्रियेदरम्यान मुंबईतील सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू असते.अशातच अल्पसंख्याक कोट्याच्या (Minority Quota) काही प्रतिष्ठीत कॉलेजेसमध्ये कोट्याच्या जागांमध्ये अंतर्गत अफरातफर करून प्रवेश प्रक्रिया पार पडल्याची माहिती महाराष्ट्र विधीमंडळात आज धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मांडला आहे. यावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याप्रकरणी चौकशी केली जाईल अशी माहिती दिली आहे.
मुंबईतील केसी, एच आर, जयहिंद या कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. ही कॉलेजेस दक्षिण मुंबईतील उच्चभ्रु भागात आहे. अल्पसंख्यांक कॉलेजेसमध्ये एकूण जागांपैकी निम्म्या जागा या विशिष्ट समाजासाठी, भाषिक लोकांसाठी राखीव ठेवल्या जातात. मुंबईमध्ये या कॉलेजात अॅडमिशन प्रक्रियेदरम्यान त्या राखीव कोट्यात नियमांप्रमाणे अर्ज न आल्याने सुमारे 40% जागांवर पैशांची मागणी करून अॅडमिशन देण्यात आल्याचा दावा धनंजय मुंडेंनी आज विधीमंडळात केला.
यंदादेखील मुंबईतील अनेक टॉप कॉलेजेसमध्ये पहिल्याच फेरीत जागा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. आज पदवी प्रवेशासाठी तिसरी यादी जाहीर होणार आहे.