Photo Credit- X

Mumbai Crime: दुचाकी पार्किंगच्या कारणावरून शनिवारी मुंबईतील मानखुर्द (Mankhurd)भागात एका महिला डॉक्टरला तिच्या क्लिनिकसमोर मारहाण करण्यात आली. आरोपींमध्ये तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दुचाकी पार्क करण्यावरून झालेल्या वादातून(Parking Dispute) महिला डॉक्टरने दुपारी एका अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. (हेही वाचा:Pimpri Chinchwad Teacher Molest Girl: पिंपरी चिंचवडमध्ये पीटी टिचरचे शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; आरोपी पोलिसांच्या अटकेत )

त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना मदतीसाठी बोलावले, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'तीन महिला, त्यापैकी एक अनोळखी, घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी महिला डॉक्टरला छत्रीने मारहाण केली. त्यांनी तिचे कपडेही फाडले. अल्पावयीन मुलाने डॉक्टरला धमकावले,' असे पोलिसांनी सांगितले. काजल रामास्वामी आणि अरुणा इंगळे अशी मारहाण करणाऱ्या महिलांची नावे आहेत. 'आरोपींपैकी एक अल्पवयीन मुलगा आहे, आणि इतर तीन महिला आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू,' असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.(हेही वाचा:Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल )

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीजवळील गोळवली गावात पार्किंग वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली होती. या वादात मारहाण झालेल्या गोदाम मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात 20-30 जणांच्या टोळक्याने दुचाकी हटवण्याच्या शुल्लक कारणावरून गोदाम मालकाला मारहाण केली होती. त्यानंतर सर्व आरोपींना पोलिसाांनी अटक केली