Pimpri Chinchwad Teacher Molest Girl: बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये(Pimpri Chinchwad Teacher) निगडीत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील घटनेत पीटी टिचरने शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत कारवाई झाली होती. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. निवृत्ती काळभोर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. (हेही वाचाBadlapur Sexual Assault Case: 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड)
निगडी येथे लि साोफिया एज्युकेशन सोसायटीचे किर्ती विद्यालय आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत पीटी शिक्षक आहे. काळभोर हा पीडित मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असल्याचेही सामोरे आले आहे. पीडित मुलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. (Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल)
तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर ‘तुला लय मारीन’ अशी धमकी देत असे. २१ ऑगस्ट रोजी पीडित मुलगी ही शौचालयातून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीटी टिचरचे तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे
#WATCH Pimpri Chinchwad, Pune (Maharashtra) | A case of alleged sexual assault of a 12-year-old girl by a PT teacher has come to light in Pimpri Chinchwad.
Police Inspector, Nigdi Police Station, Shatrughan Mali says, "The PT teacher of a school under Nigdi Police Station was… pic.twitter.com/4otwPhzvWv
— ANI (@ANI) August 24, 2024
या गुन्ह्यामध्ये काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीसुद्धा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. त्यामुळे शिक्षक निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, तसेच, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.