Badlapur Sexual Assault Case: 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात निषेध आंदोलन होत आहे. त्या दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', असे त्या म्हणाल्या.

Badlapur Sexual Assault Case: 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड
Photo Credit-X

Badlapur Sexual Assault Case: बदलापुरात लहान शळकरी मुलींवर अत्याचार शाळेतच(Adarsh School) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यावर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे.  पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन केलं. अत्याचाराच्या विरोधात शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी शपथ दिली.(Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश)

महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' घोषणा केली होती. मात्र, हायकोर्टाने बंद बेकादेशीर ठरवला. त्यानंतर महाविकास आघाडीने निषेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्ते राज्यभ आंदोलन करत आहेत. पुण्यात पुणे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शरद पवार गटाकडून मूक आंदोलन करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचारावरून सरकार टीका केली.(Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श विद्या मंदिर मध्ये चिमुरडी वर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून राज ठाकरे सरकार वर बरसले (View Post)

)

पुण्यातील निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे म्हणाल्या,'आता वर्दीची भीतीच राहिलेली नाही. बदलापूर सारख्या अनेक घटना महाराष्ट्रात होत आहेत. सरकार अंसवेदनशील आहे. बदलापूर येथील आंदोलनकर्ते बाहेरचे होते, असे म्हणतात. पण ते भारतीय होते. त्यांनी आंदोलन केले तर काय चुकले. पुण्यात रक्ताचे नमुने बदलला जातात, ड्रग माफिया पळून जातो, कोयता गॅंग आहे. पुण्यात अशी एकंदरित परीस्थिती आहे. माध्यमांनी सांगितले की, आंदोलक स्थानिकच होते. म्हणजे सरकार या घटनेवर सरकार गलिच्छ राजकारण करत आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा जाहीर निषेध करते'.

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2024 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).