बदलापूर मध्ये आदर्श विद्यालय (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) च्या दोन विद्यार्थींनीवर शाळेत सफाई कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूरच्या या घटनेवर संताप व्यक्त होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारची कानउघडणी केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी X वर पोस्ट करत 'बदलापूरची घटना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडते. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.' असं म्हटलं आहे. सोबतच 'आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?' असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
राज ठाकरे सरकार वर बरसले
महाराष्ट्रात सरकार 'जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.' असं म्हणाले आहेत. नक्की वाचा: Raj Thackeray On Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी.
मनसे अध्यक्षांनी महिला पदाधिकाऱ्यांचे केले कौतुक
बदलापूरची घटना माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे आज समोर आल्याने याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असे म्हटलं आहे. काल देखील त्यांनी 'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या'.
राज ठाकरे यांची X पोस्ट
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
दरम्यान आदर्श विद्या मंदिर च्या सफाई कर्मचार्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती.