अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पुढे येताच बदलापूर (Badlapur Sexual Assault) येथे तणाव निर्माण झाला आहे. संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरु त्यांनी पोस्ट करत लिहले आहे की "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ..." (हेही वाचा- Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण)
पाहा राज ठाकरेंची पोस्ट -
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024
दरम्यान संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन आणि शालेय परिसरात आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. दरम्यान, पालकांच्या संतापाला बांध राहिला नाही. त्यांनी शालेय आवारात घुसून तोडफोड केली. नागरिकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. बदलापूर स्थानकातील आंदोलनादरम्यान, शांततेचे अवाहन करणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक