Mumbai: विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या; सूनेसह प्रियकराला अटक
Crime | (Photo Credits: PixaBay)

दोन दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai) मधील बोरीवली (Borivali) येथे 57 वर्षीय महिला घरात मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृत महिलेची सून आणि तिच्या प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सासू सालुबाई लाखे (Salubai Laakhe) यांनी सून राधा (Radha) हिला प्रियकर दीपक माने (Deepak Mane) सोबत नको त्या अवस्थेत पाहिले. आणि त्यानंतर तिला तिचे हे प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रियकराच्या साहाय्याने हत्येचा कट रचून दगडाने ठेचून सासूची हत्या केली. रविवारी ही घटना घडली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (व्याभिचार: विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ४९७ रद्द)

राधा आणि दीपक माने यांचे अफेअर असून त्यानेच हत्या केल्याची कबुली पोलिस चौकशीदरम्यान दिली आहे. राधाचा नवरा शहराबाहेर गेला असताना शनिवारी सालुबाई लाखे यांनी राधा आणि तिचा प्रियकर यांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी सासूने सुनेला दिली. त्यानंतर राधाने सासूच्या हत्येचा कट रचला आणि घरी दगड आणून ठेवला. शनिवारी संध्याकाळी गरबा खेळण्याचे कारण देत राधा घराबाहेर गेली. त्यावेळेस दीपक माने घरी आला आणि त्याने झोपेतच सालुबाई यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी राधा आणि दीपक माने यांना ताब्यात घेतले आहे. (या '5' कारणांमुळे ठेवले जातात अनैतिक संबंध !)

दरम्यान, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या यांसारख्या अनेक घटना कानी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीने चाकू हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण स्थानकाबाहेर घडली होती. या प्रकरणी पत्नीला ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रा येथे राहणारी 50 वर्षांची महिला 20 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या दोघांचेही दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असून ती महिला 7 मुलांची आई असून तिला 5 नातवंडेही आहेत.