धक्कादायक! 7 मुलांची आई, 5 नातवांची आजी, 20 वर्षांच्या मुलासोबत पळाली; दोन वर्षापासून आहेत अनैतिक संबंध
Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash/Caroline Veronez)

आग्रा (Agra) येथील एत्माद्दौला पोलिस स्टेशन भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील 50 वर्षांची महिला आपल्या वयाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि दोघेही लग्न करण्यासाठी अडून बसले आहेत. महत्वाचे म्हणजे ही महिला सात मुलांची आई व 5 नातवांची आजी आहे. या महिलेला चार मुलगे आणि तीन मुली आहेत, त्यापैकी तीन मुलगे आणि एक मुलगी विवाहित आहे. या मुलाचेही लग्न झाले आहे. गेले दोन वर्षे या दोघांचे अनैतिक संबंध आहेत. घरच्यांनी लग्नास विरोध केल्यावर हे दोघे पळून गेले होते.

4 दिवस हे दोघे फरार असल्याने, या महिलेचा पती व मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दुसरीकडे आपल्या पतीचे एका 60 वर्षाच्या महिलेवर प्रेम आहे हे समजल्यावर, युवकाच्या पत्नीनेही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले, मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यासाठी ही महिला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिचे दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड वादावादी झाली, या दोघांनी समजावण्यात आले मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

(हेही वाचा: या '5' कारणांमुळे ठेवले जातात अनैतिक संबंध !)

या आधीही हे दोघेही न सांगता घरातून गायब झाले आहेत. यानंतर कुटुंबीयांनी अनेकवेळा त्यांना समजावून सांगितले. मात्र त्याचा काहीच फरक न पडल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. याआधी दोघांनी आत्महत्येची धमकीदेखील दिली आहे. सध्या या महिलेला तिच्या घरच्यांनी कोंडून ठेवले असून तिला अजूनही समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.