Mumbai Winters: मुंबईकर शुक्रवारी दुपारीसुद्धा थंडीमुळे कुडकुडले, आजवर सर्वात कमी तपमानाची नोंद
मुंबईकर शुक्रवारी दुपारीसुद्धा थंडीमुळे कुडकुडले, आजवर सर्वात कमी तपमानाची नोंद (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Mumbai Winters:  मुंबईकरांना यंदाची थंडी जास्तच बोचरी ठरली आहे. तसेच हवामानात अचानकच्या बदलावामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन त्याची झळ ऐन दुपारी सुद्धा शुक्रवारी (8 फेब्रुवारी) मुंबईकरांना जाणवली आहे. तसेच तापमानाचा पारा खाली घसरल्याने सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईतल्या थंडीची करण्यात आली आहे. वातारणामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन उत्तर भारतातील काही शहरात गेल्या 24 तासांत पाऊस आणि हिमवर्षाव झाला आहे.

तर गुरुवारी (7 फेब्रुवारी) उत्तर भारतात थंडीमुळे सर्वत्र गारठा पसरला होता. जम्मू-काश्मिर, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात हिमवर्षाव आणि पावसाचा अनुभव तेथील स्थानिकांना घेता आला. तसेच मुंबईकरसुद्धा या थंडीचा आनंद घेताना दिसून आले आहे. याबाबत त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपला यंदाच्या थंडीतील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा-थंडीमुळे मुंबईकर गारठले, तापमानाचा पार 24 अंश सेल्सियसपेक्षा खाली उतरला)

 

थंडीच्या कडाक्यामुळे मुंबईकरांना त्यांचे स्वेटर, कंबल, शाल आणि कानटोपी घालूनच घराबाहेरtempeपडावे लागत आहे. तसेच थंडीच्या वातावरणामुळे मुंबईकर ही खुश झाले आहेतच मात्र या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.