Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवमान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने आज मुबंई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
- Read in
- मराठी
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज, 20 जुलै रोजी शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सांगितले की, शनिवारी पहाटे 4.31 वाजता 0.71 मीटर कमी समुद्राची भरती येईल. मुंबईत शहराच्या काही भागात पावसाचा जोर पहायला मिळाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, विलेपार्ले येथील दृश्य समोर आली आहेत.(हेही वाचा: Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेकडून 21 जुलै रोजी उपनगरीय भागांसाठी मेगा ब्लॉक जाहीर; वाचा गाड्यांचे वेळापत्रक)
पोस्ट पहा
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९°C आणि २५°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 19, 2024
#WATCH | Mumbai: Rain lashes parts of Mumbai city; visuals from Western Express Highway, Vile Parle. pic.twitter.com/m5lr4Tm1op
— ANI (@ANI) July 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2024 08:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

