Mumbai Local Block: मध्य रेल्वे (Central Railway)ने मुंबई विभागातील उपनगरीय विभागांमध्ये रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान चालवण्यात येणार लोकल निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. याशिवाय, ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या यूपी फास्ट मार्गावरील सेवा मुलुंड येथे यूपी स्लो मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर यूपी फास्ट मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि 15 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.20 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी मुंबईहून दुपारी 3.03 वाजता सुटणार आहे. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी सीएसएमटी मुंबईला सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. (हेही वाचा -Bombay High Court on Mumbai Local: 'मुंबई लोकलमध्ये प्रवासी जनावरांसारखे प्रवास करताना पाहून लाज वाटते'; मुंबई उच्च न्यायालय)
ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल सीएसएमटी मुंबईला दुपारी 3.59 वाजता पोहोचेल. वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सीएसएमटी मुंबईहून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत सुटते. तसेच सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावला जाणारी डाऊन हार्बर सेवा बंद राहील. सीएसएमटी मुंबईसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत गोरेगाव/वांद्रेहून सुटणाऱ्या यूपी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (हेही वाचा -Mumbai Local Train Roof Leak: लोकल ट्रेनच्या छताला गळती; मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका (Watch Video))
डाउन हार्बर मार्गावरील गाड्या -
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी मुंबईसाठी सकाळी 11.04 वाजता सुटेल. गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी मुंबईसाठी सकाळी 10.22 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी मुंबईकडे दुपारी 04.51 वाजता सुटेल. तसेच ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी मुंबईकडे दुपारी 04.56 वाजता सुटेल.
याशिवाय, सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेलहून सकाळी 09.40 वाजता सुटेल. सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल. सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून दुपारी 03.28 वाजता सुटेल. सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 04.58 वाजता सुटेल. तसेच ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. याशिवाय, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.