Mumbai Local Train Roof Leak: सध्या राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले आहे. मुसळधार पावसाने मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. ज्यामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे मार्गांचीही हिच अवस्था आहे. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनला कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रेल्वेचे डब्बे गळू लागले (Local Roof Leak)आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. प्रवासी छत्री, रेनकोटचा आसरा घेत आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनमधील आहे. ही लोकल सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे रवाना होते. लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे या ट्रेनमध्ये प्रवाशांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. सध्या मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे या लोकल ट्रेनच्या एका डब्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना पावसात भिजूनच प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येतंय. याकडे तत्काळ लक्ष द्यावं, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून याच लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. रोज तांत्रिक कारणांमुळे प्रवाशांना रेल्वे उशिरा धाव असण्याला सामोर जाव लागतं होतं. आता पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी साचल्याने लोकल उशीरा धावत आहेत.