Bombay High Court on Mumbai Local: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवाशांना जनावरांप्रमाणे प्रवास करावा लागत असल्याचे पाहणे लज्जास्पद असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. लोकलमधील गर्दीमुळे रेल्वेमधून पडून किंवा रेल्वेसंबंधीत इतर अपघातांमुळे प्रवाशांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर जनहित याचिका ऐकून न्यायालयाने निरीक्षण नोंदवतना "अत्यंत गंभीर" समस्येला सामोरे जाणे आवश्यक आहे असे म्हटले.
यतीन जाधव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर, सरन्यायाधीश डी.के. न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'मुंबई रेल्वेची परिस्थिती दयनीय आहे' त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही उच्च अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
न्यायालयाने म्हटले आहे की, जनहित याचिकामध्ये एक अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे आणि त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही असे म्हणू शकत नाही की शहरात मोठ्या संख्येने लोकांमुळे आम्ही हे किंवा ते करू शकत नाही. तुम्ही जनावरांप्रमाणे माणसांची वाहतूक करता. "प्रवासी ज्या प्रकारे लोकलने प्रवास करतात त्याबद्दल आम्हाला लाज वाटते."
खंडपीठाने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना "संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष द्या" आणि प्रति शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.या जनहित याचिकेवर आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये 2,590 प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळून मरण पावले, त्याचे गणित केल्यास दररोज सात प्रवाशांचा मृत्यू होत आहे. त्याशिवाय, 2,441 जण जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या रुळांवर झालेल्या अपघातांमध्ये 1,650 जणांचा मृत्यू झाला, तर पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात 940 जणांचा मृत्यू झाला.