Victoria carriages (Photo Credits: Commons.Wikimedia)

दक्षिण मुंबईचं (South Mumbai)आकर्षण असणारी 'व्हिक्टोरिया' घोडागाडी (Victoria Carriages) काही वर्षांपूर्वी बंद पडली. पण आता चार वर्षांनंतर मुंबईत पुन्हा 'व्हिक्टोरिया' धावायला सुरूवात होणार आहे. मात्र आता घोड्यांऐवजी ती बॅटरीवर चालणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर दक्षिण मुंबईत 'व्हिक्टोरिया' पुन्हा धावणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, नरिमन पॉंईंट, मरिन ड्राईव्ह या भागामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात 40 व्हिटोरिया धावणार आहेत. वाहतूक पोलिस कोणत्या मार्गांवर ही वाहतूक सुरू करता येईल त्याची निश्चिती करणार आहेत. सुरूवातीला सहा महिन्यांसाठी हे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले जाईल.

जून 2015 साली मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांवर होणार्‍या अत्याचारातून त्यांना मुक्त करण्यासाठी घोडागाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईकरांनो सावधान! राणीच्या बागेत होतंय बिबट्याचे आगमन, जून 2019 पासून घेता येणार भेट

Ubo Ridez या कंपनीकडून आता बॅटरीवर चालणारी व्हिक्टोरिया धावणार आहे. यामध्ये जीपीएसदेखील चालणार आहे. त्याचा वेग प्रतिताशी 20 किमी धावणार आहेत.