Mumbai: मुंबईतील मंत्रालायाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी टाकत आत्महत्या करण्याचा दोन शिक्षकांनी प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. परंतु पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांना आत्महत्या करण्यापासून बचावले होते. या प्रकरणी मुंबईतील सेशन कोर्टाने या दोन्ही शिक्षकांना 15 दिवसांची तुरुंगाची शिक्षा ठोठावली आहे. या व्यतिरिक्त दोन्ही शिक्षकांवर दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे. अरुण नेरट आणि हेमंतराव पाटील अशी शिक्षकांची नावे आहेत.(Raigad: पॅरोलवर सुटून आलेल्या आरोपीने 3 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून केली हत्या; पेणमधील वडगाव परिसरातील घटना)
अरुण नेरट आणि हेमंतराव पाटील हे दिव्यांग शाळेसाठी आर्थिक मदत मागत होते. मात्र त्यांची मागणीवर सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्यानेच मंत्रालयाच्या इमारतीवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दोन्ही शिक्षकांना आत्महत्या करण्यापासून वाचवले होते. पोलिसांच्या मते मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमुळे दोन्ही शिक्षकांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी माहिती देत असे म्हटले की, दोन्ही शिक्षक हे प्रमुख सदस्य असल्याने मंत्रालयात आले होते आणि त्यांनी आर्थिक मदतची ही मागणी केली होती. तर मंत्रालयात लावण्यात आलेल्या नायलॉनच्या जाळीमुळेच जीव वाचल्याची घटना गेल्या वर्षात ही अशाच पद्धतीची एक घटना घडली होती. गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 54 वर्षीय व्यक्तीने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी टाकत आत्महत्या केली होती.(Latur: धक्कादायक! लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; पीडितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या)
या व्यक्तीने त्याच्या बहिणीला आत्महत्येसाठी दोषी ठरवले होते आणि तो 10 जानेवारी पासून पेरॉलवर होता. त्याच्या एक दिवस आधीच बेरोजगार व्यक्तीने इमारतीच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आढावा घेण्याचे आवाहन केले होते.