Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Mumbai Mega Block: मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर मंकी हिल ते कर्जतदरम्यान (Monkey Hill to Karjat Block) महिनाभर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामांमुळे 30 नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - IRCTC Tatkal Train Ticket: रेल्वे तात्काळ तिकीट बुकींगच्या बदललेल्या वेळा आणि नियम)

मंकी हिल ते कर्जतदरम्यान 21 ऑक्टोबरला 10 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, या कालावधीत या मार्गावरील कामे पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुढील महिनाभर म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मंकी हिल ते कर्जतपर्यंत मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. या रेल्वे  ब्लॉकमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे 22 एक्सस्प्रेस रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

या गाड्या 31 नोव्हेंबरपर्यंत धावणार पुण्यापर्यंत -

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस

एलटीटी-विशाखापट्टनम-एलटीटी

एलटीटी-हुबली-एलटीटी

पनवेल-नांदेड-पनवेल

ब्लॉक दरम्यान, भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस 31 ऑक्टोबरपर्यंत दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे. या रेल्वे मार्गावर मागील आठवड्यात 10 दिवसांचा ब्लॉग घेण्यात आला होता. त्यामुले रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर लगेचच 1 महिनाभर ब्लॉग घेण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.