TMT AC Bus | (File Image)

ठाणे महानगर परिवहन (TMT - Thane Municipal Transport) मंडळाच्या बसने तुम्ही जर मुंबईला (Mumbai to Thane) जात असाल किंवा जाणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टीएटीने ठाणे मुंबई वातानुकुलीत बस ( (TMT AC Bus) भाड्यात मोठी कपात केली आहे. आता ठाणे-मुंबई एसी बस प्रवास केवळ 65 रुपयांमध्ये होणार आहे. होय, टीएमटीने एसी बस प्रवासी भाडे दरात तब्बल 40% ते 50% कपात केली आहे. ज्यामुळे प्रवाशांना भर उन्हाळ्यात गारेगार बसने प्रवास करणे सोपे आणि सोईचेही होणार आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजूरी घेतली जाईल त्यानंतर नव्याने समाविष्ट केलेल्या इलेक्ट्रिक एसी बसेस आणि व्होल्वो या दोन्ही सेवांमध्ये हे नवे बदले दर लागू होतील. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई ही महाकायरित्या वाढू लागलेली शहरं आपापसात स्पर्धा करु लागली आहेत. त्यामुळे ही स्पर्धा परिवहन विभागातही पाहायला मिळते आहे. सहाजिकच बेस्ट (BEST) आणि नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) बस यांच्या तुलनेत आणि स्पर्धेत टीकून राहण्यासाठी टीएमटी (TMT) ने हा पर्याय स्वीकारला आहे. (हेही वाचा, Free Air Tickets: हाँगकाँगमध्ये येणाऱ्या जगभरातील 5 लाख लोकांना मिळणार मोफत विमान तिकीट, जाणून घ्या सविस्तर)

कसे असतचील दर? जाणून घ्या सुधारीत आणि पूर्वीचे दर

टीएमटी एसी बस किमान भाडे

जुना दर- पहिले दोन किलोमटीर-20

सुधारीत दर- पहिले दोन किलोमीटर- 10 (50% कपात)

जुना दर- कमाल भाडे 105 रुपये

सुधारीत दर- कमाल भाडे 65 रुपये (40% कपात)

दरम्यान, आता खासगी एसी बसेसही रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. त्यामुळे खासगी बस कंपन्यांशी स्पर्धा करत असताना टीकून राहण्यासाठी सरकारी परिवहन कंपन्यांना (मंडळे) अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. सुधारीत दर हे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर (RTI) भाडे सुधारणा दर सादर केले जातील. अंतिम मंजूरी मिळाल्यानंतरच हे दर लागू करणयात येतील.