मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ:  मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम मधील हे आहेत  विजयी उमेदवार
Maharashtra Assembly Elections 2019 | File Image

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ची रणधुमाळी यंदा 21 ऑक्टोबर दिवशी रंगणार आहे. राज्यात 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नबनिर्मान सेनेपासून कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाई सह अपक्षांनी देखील आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. राज्यातील 288 आमदार आणि मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याच्या निवडीसाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणूकीमध्ये मुंबई शहर उपनगरातील मुलूंड(Mulund Vidhan Sabha Constituency), विक्रोळी (Vikroli Vidhan Sabha Constituency), भांडूप (Bhandup West Constituency), घाटकोपर पूर्व (Ghatkopar East Constituency) आणि घाटकोपर पश्चिम (Ghatkopar West Constituency) विधानसभा मतदार संघातून कोण निवडणूकीच्या रिंगणात कोणत्या प्रबळ दावेदारांमध्ये लढत होणार आहे हे नक्की पहा. इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा सारे अपडेट्स.

मुलुंड विधानसभा मतदारसंघ 

मुलुंडमध्ये मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांचं वर्चस्व आहे. त्यामुळे मागील 28 वर्षांपासून मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्ष बाजी मारताना दिसत आहे. सध्या या मतदारसंघात भाजपाचे सरदार तारासिंह भाजपाचे आमदार आहेत. 1999 पासून सलग चार वेळेस विधानसभा निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदा मिहीर कोटेचा हे भाजपाचे तर गोविंद सिंग कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. मनसेने हर्षदा राजेश चव्हाण यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

विजयी उमेदवार: मिहीर कोटेचा

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ 

दलित मतदारांचं प्राबल्य असणार्‍या विक्रोळी मतदार संघामध्ये सध्या शिवसेनेचे सुनील राऊत हे विद्यमान आमदार आहेत. स्थानिकांचा या विधानसभा मतदारसंघामध्ये मूळ नागरी समस्यांवर सरकारने तोडगा काढावा अशी मागील अनेक वर्षांची मागणी आहे. यंदा विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या सुनील राऊत विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय पिसाळ विरूद्ध विनोद शिंदे असा सामना रंगणार आहे.

विजयी उमेदवार: सुनील राऊत

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ 

मुंबई उपनगरामधील भांडूप पश्चिम हा एक एक संमिश्र मतदारांचा विधानसभा मतदार संघ आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे अशोक पाटील हे विद्यमान आमदार आहेत.यंदा निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेने रमेश कोरगांवकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडणूकीच्या रिंगणात कॉंग्रेसच्या सुरेश कोपरकर आणि मनसेचे संदीप जळगावकर यांचं आव्हान आहे.

विजयी उमेदवार: रमेश कोरगांवकर

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

घाटकोपर पश्चिम हा भाजपाच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. घाटकोपरमध्ये भाजपाचे राम कदम हे विद्यमान आमदार आहेत. पूर्वी मनसे आणि आता भाजपामधून राम कदम आमदार झाल्यानंतर यंदा भाजपाने पुन्हा राम कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महिलांविषयक आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या राम कदम यांच्या विरोधात स्थानिकांमध्ये, भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे. यंदा राम कदम यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या मनीषा सूर्यवंशी आणि मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. घाटकोपर विधानसभा मतदारसंघात युतीच्या राम कदम यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध; 'उद्धव ठाकरे माफ करा, आमचं मत मनसेला' अशी पोस्टरबाजी.

विजयी उमेदवार:  राम कदम 

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ 

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघामध्येही मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य आहे. या मतदारसंघात नागरी सोयी सुविधा यांचा अभाव आहे. भाजपाचे प्रकाश मेहता 6 वेळा सलग आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र घोटाळ्याचे आरोप असलेल्या प्रकाश मेहता यांना नाकारत भाजपाने यंदा पराग शाह यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यांच्या विरोधात मनसेचे सतीश पवार, कॉंग्रेसच्या मनीषा सूर्यवंशी यांच्यामध्ये लढत होणार आहे. भाजपा उमेदवार पराग शहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती 500 कोटी.

विजयी उमेदवार:  पराग शाह 

 सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.