मुंबईच्या चर्नी रोड स्थानकामध्ये (Charni Road Station) एका साखळीचोरासोबत झटापट करताना महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. 12 मार्चच्या रात्री ही घटना घडली आहे. पीडीता चर्चगेटला (Churchgate) जात असताना हा प्रकार घडला आहे. असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षता नागरे हे पीडीतेचं नाव आहे. वांद्रे येथून चर्चगेट कडे जाणारी ट्रेन तिने रात्री 11.45ला पकडली होती. अक्षता महिला आरक्षित डब्ब्यामध्ये चढली होती. ट्रेन जेव्हा चर्नीरोडस्थानकामध्ये थांबली तेव्हा साखळीचोर आत शिरला. अक्षताच्या गळ्यातील सोन्याची चेन त्याने पाहिली. ती खेचण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला. मात्र या झटापटीमध्ये अक्षताच्या मानेजवळ जखमा झाल्या आहेत. तिच्यावर ब्लेड हल्ला झाला आहे. हे देखील नक्की वाचा: Crime: लोकल ट्रेनमध्ये 17 वर्षीय तरुणीसह तिच्या दिव्यांग मावशीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरूणाला न्यायालयाने 3 वर्षे कारावासाची सुनावली शिक्षा.
चर्चगेट पोलिसांनी या हल्ल्याबाबत तक्रार नोंदवून घेतली आहे. सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांकडून या सीसीटीव्ही फूटेजवरून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबई लोकल मध्ये अशाप्रकारे हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत.
3 आठवड्यांपूर्वी नायगाव रेल्वे स्थानकामध्ये Rizwan Hanif Shaikh याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 10 चोरीमारी मध्ये शहरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पश्चिम उपनगरामध्ये बोरिवली जीआरपी मध्येच 5 गुन्ह्यांची नोंद आहे.