मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगेत आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंधेरी मधुन गुरूवारी बेपत्ता झालेली मुलगी शुक्रवारी दुपारी पालघर मधील नायगाव मध्ये मृतावस्थेत आढळली आहे. तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅग मध्ये आढळल्याने सार्या परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. वाळीव पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राच्या वाराच्या खूना आहेत. विलेपार्ले परिसरामध्ये ही मुलगी सकाळी 11.45 च्या सुमारास अंधेरीवरून निघाली होती. संध्याकाळी 6 वाजून गेले तरी ती न परतल्याने तिच्या पालकांनी वर्गमित्राला फोन केला तेव्हा त्याने मुलगी शाळेतच आली नसल्याचं सांगितलं. नंतर पालकांनी अंधेरी पोलिसामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हे देखील नक्की वाचा: Shocking: लिलावामध्ये एका कुटुंबाने जिंकल्या सुटकेस; घरी उघडून पाहताच त्यामध्ये आढळले मानवी मृतदेह!
शुक्रवार (26 ऑगस्ट)च्या दुपारी पोलिसांना परेरा नगर येथील झुडपात ट्रॅव्हल बॅग आढळली. मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून बॅगेत भरण्यात आला होता. पोलिसांनी सध्या मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. तसेच खूनाचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर माजी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी शोक आणि संताप व्यक्त करत मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत त्यांनी तातडीने तपासाची आणि आरोपींना कडक शासनाची मागणी केली आहे.
Every such incident highlights the our system's failure to protect our girls & renders all our slogans meaningless. Gender-based violence & sexual crimes impact a girl's ability to participate in school, work,public life. Hope we as a society introspect & address this depravity
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 27, 2022
मीडीया रिपोर्ट्सनुसार या अल्पवयीन मुलीच्या खूना प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस स्टेशन मध्ये अपहरणाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.