मुंबई: चेंबूर परिसरात 4 वर्षीय मुलाची बादलीत बुडून मृत्यू
Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईत चेंबूर (Chembur)  परिसरामध्ये घरात कुणी नसताना खेळता-खेळता एक चार वर्षीय मुलगा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यूमुखी पडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार, मृत मुलाची आई किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती तेव्हा हा प्रकार झाला. देवांश घाटविसावे असं या मृत मुलाचं नाव असून चेंबूर पोलिस स्टेशन मध्ये त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान देवांशच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घाटविसावे कुटुंब चेंबुर मध्ये मारोली चर्च मध्ये नालंदा नगर मध्ये राहत होते सोमवार (30 ऑगस्ट) दिवशी देवांशची आई घरातील सामान आणण्यासाठी बाहेर पडली. यावेळी देवांश जवळ त्याच्या आईचे सासरे आणि भाची होती. देवांश आई घरी आल्या नंतर तिने त्याच्याबद्दल विचारले. सार्‍यांना वाटलं तो घरात झोपला असेल पण तो बाथरूम मध्ये बादलीत डोकं आणि पाय वर अशा अवस्थेमध्ये दिसला. यावेळी देवांश बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. तातडीने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. (नक्की वाचा: Junnar Leopard Attack: जुन्नर मध्ये 3 वर्षीय बाळावर बिबट्याचा गंभीर हल्ला).

डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, देवांशच्या नाका-तोंडामध्ये पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात कुटुंबाचादेखील कुणावर संशय नसल्याचं सांगण्यात आले आहे. चेंबूर पोलिसांनी हा मृत्यू अपमृत्यू म्हणून नोंदवला आहे. ही बातमी परिसरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.