पुण्यातील जुन्नर (Junnar) मध्ये एका 3 वर्षीय मुलावर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार काल (29 ऑगस्ट) रात्री 10 च्या सुमारास झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव अक्षय चासकर आहे. राजुर च्या गव्हाळी मळ्यात चासकर कुटुंब राहत होते. बिबट्याने अंगणातून बाळाला फरफटत नेले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. नक्की वाचा: झाडावरुन खाली उतरणाऱ्या बिबट्यावर लोकांची विनाकारण दगडफेक, सोशल मीडियात युजर्सकडून संताप व्यक्त (Watch Viral Video).
टीवी 9 च्या रिपोर्ट नुसार, अक्षय चासकर यांचा 3 वर्षांचा वेद अंगणात होता. अचानक बिबट्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याला तोंडात पकडून फरफटत ऊसाच्या शेतामध्ये नेले. बिबट्याने हल्ला केल्यानंतर बाळ रडायला लागले. त्याच्या आवाजाने घरातील लोकं बाहेर आली त्यावेळी त्यांना बिबट्याने हल्ला केल्याचं लक्षात आलं. गावकर्यांच्या आवाजाने बिबट्या बाळाला टाकून गेला पण तो पर्यंत वेद गंभीररित्या जखमी झाला होता. वेदला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेलं 3 वर्षीय बाळ#LeopardAttack #Junnar #Pune pic.twitter.com/2KxNg3u7MB
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) August 30, 2021
आळेफाटा परिसरामध्ये बिबट्यांवर हल्ला होत असल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राजुरी भागात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.