Indian Share Market | (Photo credit: archived, edited, representative image)

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर शुक्रवार पासूनच भारतीय शेअर बाजारात आनंदाचं वातावरण पहायला मिळालं आहे. आज सोमवार ( 23 सप्टेंबर) दिवशी देखील हा उत्साह कायम राहिला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने (Sensex) सुमारे 1200 अंकांची उसळी घेतली आहे. सकाळी सेनेक्स 39,005.79 वर पोहचला आहे.

शेअर बाजारात सेन्सेक्स प्रमाणेच निफ्टीदेखील उत्तम स्थितीमध्ये आहे. 392 अंकांनी उसळी घेत आज निफ्टी 11,666.35वर पोहचली आहे. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाकडून टॅक्समध्ये कपात करण्यात आल्याचे वृत्तानंतर रेकॉर्डब्रेक उसळी पाहिली होती. डॉलरच्या तुलनेत मात्र रूपया आजही घसरला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रूपया 10 पैशांनी घसरला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य 71.04 इतके आहे. कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सरकारचा निर्णय, शेअर बाजारात 1600 अंकांची उसळी

 

ANI Tweet

शुक्रवारी शेअर बाजारातूनही सरकारच्या नव्या धोरणांचं स्वागत करण्यात आले. यावेळेस सेन्सेक्स 1923.90 अंकांवर म्हणजे 5.33 % वाढ झाल्यानंतर 38,017.37 वर बंद झाला होता. तर निफ्टी 570.70 अंक म्हणजे 5.33% वाढून 11,275.50 वर बंद झाला होता.