कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सरकारचा निर्णय, शेअर बाजारात 1600 अंकांची उसळी
Union Finance Minister Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

Economic Slowdown In India 2019: देशातील अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्रालयाने कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. अर्थमंत्रालयाच्या निर्णयाचा शेअर बाजारात काही वेळातच परिणाम पाहायल मिळाला. अर्थमंत्रालयाच्या निर्णयाने 1600 अंकांची उसळी पाहायला मिळाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी गोवा (GOA) येथील जीएसटी काऊन्सील ( GST Council) बैठकीपूर्वी Corporate Tax दरात कपात केल्याची मोठी घोषणा केली. अर्थमंत्रालयाच्या या निर्णयाचे शेअर बाजारात मोठे पडसाद पाहायला मिळाले.

जीएसटी काउन्सील बैठक (GST Council Meeting) गोवा येथे पार पडत आहेत. तत्पूर्वी सीतारमण यांनी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेतच त्यांनी मंदीसदृश्य वातावरणातून उद्योग क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी कॉरपोरेट टॅक्स (Corporate Tax) कपात करत असल्याचा निर्णय जाहीर केला.

एएनआय ट्विट

अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच एक अध्यादेश लागू करुन स्थानिक कंपन्या तसेच, नव्य घरगुती उत्पादन कंपन्या आदिंसाठी कॉर्पोरेट कर कमी करण्याचा प्रस्तव दिला. आता कंपन्यांसाठी नवा कर दर (Tax Rate) 15.17 टक्के इतका असेन. कर दरात सवलत मिळताच शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारात तब्बल 1600 अंकाची उसळी पाहायला मिळाली.

एएनआय ट्विट

पुढे बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, जर घरगुती उत्पादन कंपन्यांपैकी एखादी कंपनी सरकारच्या प्रोत्साहनाचा लाभ काही कारणांनी घेऊ शकत नसेल, तर त्यांच्याजवळ 22 टक्क्यांच्या दराने करभरणा करण्याचा पर्याय आहे. ज्या कंपन्या 22 टक्के दराने करभरणा करण्याचा पर्याय वापरु इच्छिते त्यांना किमान पर्यायी कर भरण्याची आवश्यकता असणार नाही.