मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असणाऱ्या वादामुळे भारतीय बाजारात बरीच उलाढाल होत आहे, परिणामी आज, शेअर बाजारात सेन्सेक्सने (Sensex) 438.67 अंकांची भरारी घेतली असून 41,256.41 पॉइंट्सचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे निफ्टी (Nifty) मध्ये सुद्धा 151 पॉइंट्सची वाढ होऊन हा स्तर 12,177 पर्यंत पोहचला आहे.शेअर मार्केट (Share Market) अभ्यासकांच्या माहितीनुसार, अमेरिका- इराण (America- Iran) मध्ये सुरु असणाऱ्या वादामुळे भारतीय बाजारात गुंतवणुकीला चालना मिळत आहे परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये उत्तम आकडे समोर येत आहेत. 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जाहीर करणार अर्थसंकल्प
प्राप्त माहितीनुसार, सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर मध्ये तर निफ्टी च्या 50 पैकी 47 शेअर्स मध्ये आज सकाळी चांगली वाढ पाहायला मिळाली. यातही SBI आणि इंडसइंड बँकेचे शेअर प्रत्येकी 2 टक्क्याने वाढले आहेत. तर टाटा स्टील आणि ICICI बँकेच्या शेअर मध्ये प्रत्येकी 1.8 टक्के वाढ झाली आहे. ऍक्सिस बँकेत 1.5%, रिलायन्स इंडस्ट्रीत 1.4% , महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये 1.4%मारुती मध्ये 1.3% एवढी मोठी वाढ झाली आहे.
ANI ट्विट
Sensex at 41,256.41 , up by 438.67 points pic.twitter.com/BhUH3hM6xP
— ANI (@ANI) January 9, 2020
दरम्यान, अमेरिका इराण संघर्ष अजूनही पेटलेला आहे, परिणामी देशात गुंतवणूक ही अधिकाधिक सुरक्षित व्यवसायात करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. याच कारणाने सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक वाढत आहे.