शेअर बाजारात या आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवहाराच्या गतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी सकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांचे सेनसेक्समध्ये 122 अंकांनी वाढला असून 49,953 च्या घरात पोहचला आहे. व्यवहाराच्या दरम्यान सेनसेक्सने 40 हजाराचा आकडा पार केला आहे. सकाळी 10.55 मिनिटांनी सेनसेक्स 40,039 वर स्थिर झाला.
नव्या सरकाने 5 जुलै रोजी बजेट सादर केल्यानंतर पहिल्यांदाच सेनसेक्सने 40 हजारांचा पल्ला गाठला आहे. यापूर्वी 4 जून 2019 ला सेनसेक्स 40,083 वर बंद झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणूकीवेळी सुद्धा सेनसेक्सने ऐतिहासिक स्तर पार केला होता. मात्र त्यावेळी 40 हजारांच्या खाली सेनसेक्स स्थिरावला होता. त्यानंतर 31 मे रोजी व्यवहारादरम्यान सेनसेक्स 40 हजारावर गेला होता. (शेअर बाजार पुन्हा तेजीत; सेन्सेक्स 1200 अंकांची उसळी घेत 39,005.79 वर)
3 जून रोजी सेनसेक्स 40,267 वर बंद झाला असल्याने तो आतापर्यंतची त्याने ऐतिहासिक स्तर गाठला होता. बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांचे निफ्टीमध्ये 96 अंकांनी वाढ झाली असून तो 11,883.90 वर स्थिरावला. यापूर्वी मंगळवारी शेअर बाजारात जबरदस्त वेग दिसून आला. सोमवारी दिवाळी-बलिप्रतिपदा असल्याने शेअर बाजारात व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
प्री ओपनिंगच्या वेळी सेनसेक्स 40 हजाराच्या वर पोहचला होता. व्यवहारावेळी सकाळी 9.45 वाजता सेनसेक्स 48 अंकांनी वाढून 39,880 आणि निफ्टी 19.20 अंकांनी वाढून 11,806.05 वर स्थिरावला होता. मात्र रुपयात मंदी दिसून आली असून सकाळी डॉलरच्या तुलनेत व्यवहारात 6 पैशांची घट होऊन 70.90 वर स्थिरावला तर मंगळवारी रुपया 70.84 वर बंद झाला.