Mumbai High Court (Photo Credit: ANI)

नवरा-बायको, सासू-सासरे आणि मग कुटुंब यांबाबत मुंबई सेशन कोर्टाने (Mumbai Sessions Court ) एक महत्त्वपूर्ण निरीक्षण मोंदवले आहे. कौटुंबीक हिंसाचार आणि फसवणुकीच्या खटल्यात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. सारसच्या मंडळींनी टोमणे मारणे (Taunting) अथवा उपहासाने बोलणे हा काही गुन्हा असू शकत नाही. तो वैवाहीक जीवनाचा भाग आहे, असे म्हणत न्यायालयाने (Mumbai Sessions Court on Taunting By In-Laws) एका सुनबाईंना सुनावले आहे. तसेच, या प्रकरणात वृद्ध दाम्पत्य असलेल्या सासू-सासऱ्यांना अटकेपसून संरक्षणही दिले आहे.

न्या. माधुरी बरालिया यांच्या खंडपीठासमोर या खटल्यावर सुनावणी झाली. या वेळी न्यायाधीशांनी आरोपी दाम्पत्याला अटकेपासून संरक्षण दिले. मात्र, देश सोडून जाण्यास मनाई कर पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. खटल्याबाबत माहिती अशी की, या प्रकरणातील सूनेने पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीत सूनेने 80 वर्षांचे सासरे आणि 75 वर्षीय सासू यांच्या विरोधात तक्रार दिली होती. ही तक्रार कौटुंबीक हिंसाचार आणि फसवणुकीबाबत होती. आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी 26 सप्टेंबरला गुन्हा दाखल करुन घेतला.

सूनेने तक्रारीत म्हटले होते की, माझ्या पतीसोबत माझा विवाह 28 मे 2018 मध्ये झाला होता. मी आणि माझे पती शाळेपासूनचे मित्र आहोत. परंतू, घरच्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध त्याच्यासोबत माझा विवाह लावून दिला. परंतू, लग्नानंतर कळले की माझा पती हा माझ्या सासऱ्यांचा खरा पती नाही. तर त्यांनी तो त्यांच्या मोलकरणीकडून दत्तक घेतला आहे. (हेही वाचा, Sex on Promise of Marriage: लग्नाबाबत वचन देऊन ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नव्हे- न्यायालय)

सूनेन पुढे म्हटले होते की, विवाहावेळी साररच्यांनी माझ्या अंगावर दागिणे घेतले. परंतू लगेच ते परतही घेतले. त्या उलट माझ्या कुटुंबीयांनी (माहेर) माझ्या पतीला 10 तोळ्यांची चेन भेट दिली. दोन्ही बाजूचा विवाहाचा खर्च आमच्या घरच्यांनीच केला. मला भारतात ठेऊन पती दुबईला गेला. मी सासू सासऱ्यांसोबत राहिले परंतू, त्यांनी माझा छळ सुरु केला. ते मला घरातील फ्रीज, टीव्ही अथवा तत्सम वस्तूंना हात लावू द्यायचे नाहीत. बाहेरच्या खोेलीत झोपायला सांगायचे. बेडरुममध्ये झोपली की सासू माझ्या अंगावरचे पांगरुन खेचून घ्यायची. पतीला त्याबाब कल्पना दिली तर तोही माझा उपहासच करत असे, असे सूनेने पोलिसांकडे केलेल्या फिर्यादीत म्हटले होते.

न्यायालयाने सून आणि सासरकडील मंडळी असे दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतले. सासरच्यांनी सांगितले की, विवाहातील दोन्ही बाजूचा खर्च अर्धा अर्धा करण्यात आला होता. सूनेने लावलेले आरोप तथ्यहीन आहेत. तिचा प्रेमविवाह आहे. ती पतीसाठी वारंवार दुबईला जायची. नंतर मुंबईत परतली की माहेरी जायची. विवाहापूर्वी तिचे आमच्या घरी नेहमी येणेजाणे असायचे. तिने केलेल्या तक्रारीबाबत आम्हाला कल्पना नव्हती. आमचे बँक खाते गोठवल्यानंतर आणि पोलिसांचे समन्स आल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती कळली, असे सासरच्यांनी सांगितले.

दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालाने सांगितले की, खटल्यातील आरोप हे सर्वसाधारण स्वरुपाचे आहेत. सारसच्या मंडळींनी टोमणे मारणे अथवा उपहासाने बोलणे हा काही गुन्हा असू शकत नाही. तो वैवाहीक जीवनाचा भाग आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.