लग्नाचे अश्वासन (Promise of Marriage) देऊन जर एखाद्या महिलेसोबत एखाद्या पुरुषाने वारंवार जवळीक अथवा दोघांमध्ये अनेक वेळा शरीरसंबंध (Sex ) प्रस्थापीत झाले असतील तर त्याला बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही. लग्नाचे अमिष दाखवून प्रत्येक वेळी एकमेकांच्या संमतीने ठेवलेले शीरसंबंध हा बलात्कारच ( Not Always Rape) असतो असे म्हणता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HC) नोंदवले आहे.
एका महिलेकडून दिल्ली उच्च न्यायालायत दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. या खटल्यावर सुनावणी करत न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादी महिला आपल्या स्वच्छेने एखाद्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर अशा वेळी लग्नाचे वचन देऊन ठेवलेले सबंध बलात्कार मानता येणार नाहीत.
एका महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात एका व्यक्तीवर आरोप केला होता की, आरोपीने तिला लग्नाचे अमिश दाखवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या खटल्यात महिलेचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले आणि आरोपीला दोषमुक्त केले. या खटल्या ट्रायल कोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवत महिलेची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने आपले निरीक्षण विस्तृत स्वरुपात मांडताना म्हटले की, लग्नाचे अमिश दाखवून शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कार म्हणता येणार नाही. बलात्कार तेव्हाच म्हणता येईल ज्या घटनेत महिला पीडित असेल. अथवा तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवण्यासाठी सक्ती करण्यात येईल. असे घडले नसेल तर त्या घटनेस बलात्कार मानले जाणार नाही. न्यायालयाने पुढे असेही म्हटले आहे की, लग्नाचे अमिश दाखवून जर सेक्स केला जात असेल तर त्या गोष्टीसाठी महिलेच्या सहमतीचा गैरवापर आहे. अशा घटनेमध्ये कलम 375 अंतर्गत बलात्काराची तक्रार दाखल होते. परंतू, अशा घटना जर वारंवार घडल्या असतील तर त्याला महिलेची संमती होती असे मानले जाईल.