Mumbai Rains Update: मुंबई मध्ये पुन्हा पावसाला सुरूवात, पुढील 2-3 तास दमदार सरी बरसणार; स्कायमेटचा अंदाज
Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून मुंबईकरांची तारांबळ उडवली आहे. 2 जुलै दिवशी विक्रमी पावसानंतर काल थांबलेला पाऊस आता पुन्हा कोसळायला सुरूवात झाली आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये पुन्हा दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसादरम्यान मुंबईमध्ये अद्यापही वाहतूक सेवा रेंगाळलेली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या काही दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज स्कायमेट नेही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पुढील 2-4 तास पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्कायमेटचा आजचा अंदाज

ANI Tweets 

मुंबईमध्ये लाईफ लाईन समजल्या जाणार्‍या रेल्वे लाईनला देखील पावसाचा फटका बसला आहे. मुंबईमध्ये रेल्वे 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे. तर मागील दोन दिवसांपासून मुंबई एअरपोर्टचा मेन रनवे देखील अद्याप बंद आहे. पर्यायी धावपट्टीवरून मुंबई विमानतळावर वाहतूक सुरू आहे.