Mumbai Monsoon 2020| Photo Credits: ANI / Twitter

निसर्ग चक्रीवादळाचे मुंबई शहरावरील सावट गेल्यानंतर आज शहरामध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह, वीजेच्या लखलखाटांसह मुंबई शहरामध्ये (Mumbai City) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील वाहत आहे. दरम्यान हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वार्‍यामुळे हा पाऊस बरसला आहे. सकाळी 8.30     पर्यंत कुलाबा     मध्ये      50   मीमी तर सांताक्रुझ मध्ये 25 मीमी पाऊस पडला आहे. तर मध्यम स्वरूपात पुढिल 2 तास पाऊस बरसण्याची शक्यता आहे.  दरम्यान 1 जूनला केरळमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये 2 ते 4 जून पासून मान्सून पूर्व सरी बरसू शकतील असा अंदाज हवामान खात्याने मागील काही दिवसांमध्ये दिला होता. दरम्यान यंदा मुंबई मध्ये मान्सून सरासरी 11 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आता मुंबई शहरातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली आहे.

मुंबई सोबतच ठाणे शहरामध्ये जोरदार पावसाची सुरूवात झाली आहे. आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ठाणे शहराचे कमाल तापमान 36 अंश डिग्री असेल. तर मुंबईमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज आहे. Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता - हवामान खात्याचा अंंदाज.

हवामान खात्याचा अंदाज

मुंबई मधील पावसाची दृश्यं

मुंबई मध्ये आज सकाळापासूनच ढगाळ वातावरण होते. सुमारे 9.30 नंतर मुंबई, ठाण्यामध्ये काहीवेळातच धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान काल निसर्गचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि आजुबाजूच्याभागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र वादळाने उत्तरेकडे दिशा बदलल्याने मुंबई, ठाण्यातील धोका टळला.