Mumbai Rains: 31 जुलैपर्यंतचा पाऊस हा गेल्या 60 वर्षांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस
Mumbai Rain Update (Photo Credits: Twitter/ ANI)

Maharashtra Monsoon 2019: मुंबईमध्ये यंदा सात दिवसाच्या दमदार पावसामुळे पाणीसंकट टळणार असल्यास दिलासादायक बातमी लवकरच मुंबईकरांना मिळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलै महिन्यात केवळ 7 सात दिवसांच्या पावसाने विक्रमी नोंद केली आहे. यंदा 60 वर्षातील दुसरा सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 31 जुलै पर्यंत झालेल्या पावसाचा यामध्ये समावेश आहे. यंदा जुलै महिन्यात 1464.2 मिमी पाऊस पडला आहे.  मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68 %

यंदा जून महिन्यात 29 तारखेला तर जुलै महिन्यात 2,9,12,26,27 जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. मुंबईच्या उपनगरात जून जुलै महिन्यात 1979.9 मिमी आणि मुंबई शहरात 1516.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2014 नंतर मागील दोन महिन्यात उपनगरांमध्ये झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा आठवड्याच्या शेवटापर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये चार धरणं ओव्हरफ्लो झाली असून सध्या पाणी साठा 31 जुलै पर्यंत 85% पेक्षा अधिक आहे.